जंगली पाणवठे आटल्याने पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती

By admin | Published: April 30, 2017 01:16 AM2017-04-30T01:16:37+5:302017-04-30T01:16:37+5:30

उन्हाचा तडाखा : पाणी व चाऱ्यासाठी गवे, डुक्कर, माकड, भेकरांच्या कळपांची नदी, मानवी वस्तीकडे धाव; पक्ष्यांचीही धडपड

Animal wanderings in the water due to wild festivals | जंगली पाणवठे आटल्याने पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती

जंगली पाणवठे आटल्याने पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती

Next

चांदोली व राधानगरी या दोन अभयरण्याला जोडणारा संपन्न वनसंपदेचा कॉरीडॉर म्हणून शाहूवाडी-पन्हाळाचा हरीत पट्टा ओळखला जातो. तिव्र उन्हाळ््यामुळे येथील वन्यजीव पाण्याअभावी तडफडत आहेत. काही वन्यजीव पाण्याचे बळी ठरत आहेत. पाण्यासाठी नदीकडे वळणारा जंगली प्राणी काठावरचे हिरवेपिक ओरबडतो आणि त्यातूनच कधी मानवावर हल्ले होवून या प्राण्यांविरोधांत तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे जंगलातील पाणी जपणे किती महत्वाचे हे अधोरेखीत करणारी ही मालीका..
आर. एस. लाड ल्ल आंबा
उन्हाचा तडाखा शिगेला पोहचला असताना डोंगरातील मानवी वस्तीवर पाण्याचे दूर्भिक्ष जाणवू लागले आहे. तर सभोवतालच्या जंगलातील पाणवठ्यानी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्यासाठी जंगली प्राण्यांची या जंगलातून त्या जंगलाकडे भटकंती सुरू झाली आहे. आंबाघाटाशी सलग्न असलेल्या पाच किलोमिटर सह्याद्रीच्या रांगेतील चाळणवाडी जंगलातील चारही झरे कोरडे झाले आहेत. येथील बाध्याचे पाणी, जखणीचं पाणी व भुयाराच्या पाणवठ्याने पाणी आटल्याने मार्च अखेरीस चिखलाचे रूप घेतले. झऱ्यावर येणा-या प्राण्यांच्या पायाच्या ठश्यापूरते पाणी साठते व त्यावर पक्ष्यांसह भेकरे, हरीणांची तहाण भागते. पण गवा, डूकरांची मात्र येथे निराशा होते. डूक्कर झऱ्यातील चिखलात लोळण घेवून थंडावा घेण्यावर भागवित असल्याचे चित्र आहे. ग्रामदेवी विठ्ठलाई येथील पाझर फूटभर शिल्लक आहे.
आंबा, चाळणवाडी, मानोली, तळवडे, हुंबवली, घोळसवडे हा सुमारे 15 ते 18 किलोमिटरचा जंगल पट्टा विशाळगडच्या दिशेने गजापूर-पावनखिंडच्या जंगलाला मिळतो.मानोलीच्या धरणाचा जलाशय,धुपाचे पाणी,रातांब्याचा झरा, सड्याखालचे पाणी व पूढे वाघझरा व केंबुणेर्वाडीचे पाणी जंगली प्राण्यांचे पाणवठे आहेत.वाघझ-यावर पर्यटकांची वर्दळ नेहमीच असते. तरी गवे, माकडे, डूकरे येथे पाण्यासाठी धावतात. एप्रिल अखेरीस जंगलातले अन्य पाणवठे आटले. मग वाघझ-याचे बारमाही पाणी प्राण्यांना पर्याय ठरतो. त्यामुळे पाण्यासाठी पर्यटकांची वर्दळ चुकवत, बॉक्साईड उत्खननातील घरघर ऐकतच येथील वन्यजीवांवर कडवी नदी व महामार्ग ओलांडावा लागतो. परिणामी वस्ती, महामार्गावर येणारे गवा-डुकरांचे कळप मानव व प्राणी या दोघात तेढ वाढवत आहे.

Web Title: Animal wanderings in the water due to wild festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.