अंनिस दिल्लीत आंदोलन करणार

By Admin | Published: January 21, 2015 01:45 AM2015-01-21T01:45:13+5:302015-01-21T01:45:13+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटूनही त्याचा छडा लागलेला नाही.

Anis will be campaigning in Delhi | अंनिस दिल्लीत आंदोलन करणार

अंनिस दिल्लीत आंदोलन करणार

googlenewsNext

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटूनही त्याचा छडा लागलेला नाही. सीबीआयकडूनही तपासामध्ये काहीच प्रगती नाही़ त्यामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात येणार असल्याचे हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी सांगितले़ तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ अंनिसच्या वतीने ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निर्दशने करण्यात आली. यावेळी हमीद दाभोलकर, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, शहराध्यक्ष माधव गांधी, कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, नंदिनी जाधव, दिपक गिरमे उपस्थित होते.
हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे जनप्रबोधनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त
करण्यात येणार आहे. यावेळी ‘सॉक्रीटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगण नाट्याचे प्रयोग केले जाणार आहेत. तसेच दाभोलकरांच्या कामाविषयी प्रबोधन केले जाणार आहे.’’
राज्य सरकार दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात यशस्वी न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आठ महिन्यांपूर्वी हा तपास सीबीआयकडे सोपवलेला आहे.
सीबीआय केंद्रसरकारच्या अखत्यारीत येत आहे. राज्याप्रमाणेच केंद्रामध्येही भाजपाचे सरकार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आणि सीबीआय प्रमुखांना पाठपुराव्याचे पत्र देऊनदेखील तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही.

च्पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्ली जात असलेल्या अंनिसच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यावे अथवा आपल्या प्रतिनिधी पाठवावा. सीबीआयने दाभोलकरांच्या खुनाचा तपास गतिमान करावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगावे, असे आवाहन हमीद दाभोलकर यांनी केले.

च्१३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे जनप्रबोधनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यावेळी ‘सॉक्रीटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगण नाट्याचे प्रयोग केले जाणार आहेत. तसेच दाभोलकरांच्या कामाविषयी प्रबोधन केले जाणार आहे.

Web Title: Anis will be campaigning in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.