सबळ पुराव्यांअभावी अंजली दमानिया काढताहेत पळ - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 02:06 AM2020-01-13T02:06:09+5:302020-01-13T02:06:37+5:30

दमानिया यांच्याकडे सबळ पुरावे नसल्याने त्या ३ वर्षांपासून अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दमानिया यांच्यावर केला आहे

Anjali Damania is fleeing due to strong evidence - Khadse | सबळ पुराव्यांअभावी अंजली दमानिया काढताहेत पळ - एकनाथ खडसे

सबळ पुराव्यांअभावी अंजली दमानिया काढताहेत पळ - एकनाथ खडसे

Next

जळगाव : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये अब्रुनुकसानीचे खटले दाखल केले आहेत.

परंतु दमानिया यांच्याकडे सबळ पुरावे नसल्याने त्या ३ वर्षांपासून अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दमानिया यांच्यावर केला आहे. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी दमानिया यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले होते. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे आमचे म्हणणे होते. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध २७ ठिकाणी दमानिया यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहे. दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोप पुराव्यांनिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रुनुकसानीपोटी भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे, असे या दाव्यांमध्ये म्हटले आहे.

आरोप हास्यास्पद - दमानिया
खडसे यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि हास्यास्पद आहेत. राजकारणात त्यांना आता काहीही काम उरलेले नसल्यानेच ते असले उद्योग करीत आहेत, असे दमानिया यांनी सांगितले.

Web Title: Anjali Damania is fleeing due to strong evidence - Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.