अंजनी माशीच्या कुटुंबाचे घरटे अनोखे!

By admin | Published: October 13, 2015 02:52 AM2015-10-13T02:52:55+5:302015-10-13T02:52:55+5:30

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भीमाशंकरच्या जंगलात अंजनी माशीचे घरटे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या माश्या एकत्र कुटुंब पद्धतीने एकाच घरट्यात वेगवेगळे विभाग करून राहतात.

Anjani fly family's nest is unique! | अंजनी माशीच्या कुटुंबाचे घरटे अनोखे!

अंजनी माशीच्या कुटुंबाचे घरटे अनोखे!

Next

नीलेश काण्णव, घोडेगाव (पुणे)
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भीमाशंकरच्या जंगलात अंजनी माशीचे घरटे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या माश्या एकत्र कुटुंब पद्धतीने एकाच घरट्यात वेगवेगळे विभाग करून राहतात. फुग्याच्या आकाराचे हे घरटे वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे.
ओढ्यानाल्यांच्या कडेला असलेल्या आंबा, जांभूळ या झाडांच्या फांद्यांवर पावसाळ्यात या माश्या घरटे बनवतात. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात घरटे बनविणे सुरू होते. भीमाशंकर अभयारण्यात हिवाळयात अशी घरटी पाहायला मिळतात. भीमाशंकरजवळील घोडेगावमधील श्रीहरिश्चंद्र मंदिराच्या बागेतही असेच घरटे आढळले आहे.
लाळेने सालीचा भुसा एकत्र करून या माश्या घरटे तयार करतात. हे घरटे अतिशय दुर्मिळ मानले जाते. या माश्या कीटक अभ्यासकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. इंग्रजीमध्ये घरट्यांना ‘कार्टन हँड’ म्हणतात, तर माशीला ‘वास्ट’ असे संबोधन आहे. घरट्याची रचना खवल्या-खवल्यांसारखी असते. त्याचा आकार सुमारे दोन ते अडीच फूट उंच व दीड फूट व्यासाचा असतो.

Web Title: Anjani fly family's nest is unique!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.