ऐन उन्हाळ्यात भाडेवाढीचे चटके

By Admin | Published: April 18, 2017 06:00 AM2017-04-18T06:00:10+5:302017-04-18T06:00:10+5:30

शाळा व महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्यानंतर, अनेकांनी खासगी बसचे तिकीट आरक्षित करून बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असेल

Ann summer fare clips | ऐन उन्हाळ्यात भाडेवाढीचे चटके

ऐन उन्हाळ्यात भाडेवाढीचे चटके

googlenewsNext


मुंबई : शाळा व महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्यानंतर, अनेकांनी खासगी बसचे तिकीट आरक्षित करून बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असेल, तर त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. गर्दीचा काळ पाहून खासगी बस कंपन्यांनी प्रवास भाड्यात मोठी वाढ करून, ऐन उन्हाळ्यात भाडेवाढीचे चटके दिले आहेत. गोवा, शिर्डी, महाबळेश्वर, औरंगाबादच्या बस भाड्यात २00 ते ७00 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईतून नागपूरला जाण्यासाठी खासगी एसी बसने प्रत्येक प्रवाशामागे २,६४0 रुपये मोजावे लागतील.
१५ एप्रिल ते १५ जून हा गर्दीचा काळ मानला जातो. यावेळी अनेक जण गावी तर पर्यटनासाठी गोवा, कोकण तर काही महाबळेश्वर, शिर्डीला जातात. यासाठी रेल्वे, एसटीकडून जादा सेवा पुरवल्या जात असल्या, तरी तिकीट मिळताना बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे खासगी बसचा पर्यायही निवडला जातो. खासगी बससेवांना होणारी गर्दी पाहता, ही सेवा पुरवणाऱ्यांनी भाडेवाढ केली आहे. मुंबई ते गोवा एसी स्लीपरचे भाडे हे कमी गर्दीच्या काळात ८०० रुपयांपर्यंत असते. या भाड्यात तब्बल ७०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. याच मार्गावर धावणाऱ्या नॉन एसीचे भाडे ५०० रुपये वाढवण्यात आले आहे. मुंबई ते शिर्डीचे एसीचे भाडेही ४०० रुपये असते. यंदा ते ६०० रुपयांवर आहे. मुंबईहून औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, भुसावळ, जालना, बीड, सोलापूर, अमरावती, नांदेड, सांगलीला जाणाऱ्या गाड्यांना होणारी मोठी गर्दी पाहता, नेहमीच्या भाड्यापेक्षा २०० रुपयांपासून अधिक वाढ केली आहे. (प्रतिनिधी)

एसटी व खासगीमध्ये स्पर्धा
एसटी व खासगी बससेवांमध्ये नेहमीच स्पर्धा राहिलेली आहे. खासगीबरोबरच एसटीचे मुंबई ते औरंगाबाद, कोल्हापूर, सांगलीचे एसीचे प्रवास भाडे हे १,१00 रुपर्यांपर्यंत आहे.
साध्या व निमआराम
बसचे भाडे
मार्गसाधीनिमआराम
मुंबई ते मालवण५३६ रु७७१ रु
मुंबई ते कणकवली४८५ रु६६२ रु
मुंबई ते कोल्हापूर४१६ रु५६८ रु
मुंबई ते औरंगाबाद४0३ रु५५0 रु
मुंबई ते जालना४७३ रु६४५ रु
मुंबई ते सातारा२८४ रु३८७ रु

Web Title: Ann summer fare clips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.