अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

By admin | Published: April 1, 2016 01:32 AM2016-04-01T01:32:37+5:302016-04-01T01:32:37+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तीव्र उन्हामुळे अशक्तपणा आल्याने गुरुवारी दुपारी नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे

Anna Hazare admitted to hospital | अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

Next

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तीव्र उन्हामुळे अशक्तपणा आल्याने गुरुवारी दुपारी नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही तपासण्या केल्यानंतर त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
राळेगणसिद्धी येथील निवासस्थानी अण्णा हजारे यांना भोवळ आली. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. उष्णतेमुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. दक्षता म्हणून त्यांना दुपारी नगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अण्णांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या असून, आणखी काही तपासण्या करावयाच्या असल्याचे डॉ. कांडेकर यांनी सांगितले, तर ‘मला पूर्ण
बरे वाटत आहे. थोडासा थकवा जाणवत आहे,’ असे हजारे यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Anna Hazare admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.