लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचे आजपासून उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 08:39 AM2019-01-30T08:39:17+5:302019-01-30T08:40:47+5:30
लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.
मुंबई : लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.
अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथील आपल्या गावी आजपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषणास बसणार आहेत. यावेळी अण्णा हजारे म्हणाले, 'हे माझं उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरुद्ध नाही. समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्याने आंदोलन करत आलोय. हे त्याच प्रकारचं आंदोलन आहे.'
लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. याविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सरकारचे अभिनंदन करत आहे. कायदा तर विधानसभेत बनतो. त्यामुळे विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊनच कायदा बनने गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नाही.'
Anna Hazare: Kal main savere 10 baje, mere gaon Ralegan Siddhi mein annshan par baeth raha hun. Ye mera annshan kisi vyakti, paksh, party ke virudh mein nahi hai. Samaj aur desh ke bhalai ke liye baar baar main andolan karta aaya hun, usi prakar ka ye andolan hai. #Maharashtrapic.twitter.com/bcKp51Jkw2
— ANI (@ANI) January 29, 2019
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. मंगळवारी राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने आता मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येणार असून, मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तांना प्राप्त होणार आहेत.