अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस ; पुरावे द्या नाही तर माफी मागा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:02 PM2019-02-03T18:02:54+5:302019-02-03T18:03:54+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता़.

Anna Hazare notice to Nawab Malik; If you do not give evidence then apologize | अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस ; पुरावे द्या नाही तर माफी मागा

अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस ; पुरावे द्या नाही तर माफी मागा

ठळक मुद्देअण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे ३० जानेवारी २०१९ पासून बेमुदत आमरण उपोषण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता़. त्याबाबत हजारे यांच्यावतीने बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठविण्यात आली आहे़.  
मलिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती़. मात्र, नवाब मलिक यांनी यावर कोणतेही मत व्यक्त केले नाही़. त्यामुळे अण्णा हजारे यांची वकिल मिलिंद पवार यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे़. या नोटीशीत त्यांनी म्हटले आहे की, लोकपाल व लोक आयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे ३० जानेवारी २०१९ पासून बेमुदत आमरण उपोषणा साठी यादवबाबा मंदिरात बसले आहेत. अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर नुकतेच अण्णा हजारे यांच्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ह्यअण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात अशी बदनामी कारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली़. अद्याप स्वत: नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी कुठलाही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ते वक्तव्य त्यांचे वैयक्तिक होते किंवा पक्षाचे होते तसेच नवाब मलिक यांच्या कडे कुठलाही पुरावे नसताना धादांत खोटे व बदनामी कारक ती वक्तव्य होती, फक्त राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक अण्णा हजारे यांच्या विषयी बदनामी करण्याचे उद्देशाने व अण्णांविषयी समाजात चुकीचा समज निर्माण व्हावा. नवाब मलिक यांनी वरील वक्तव्य केल्याने अण्णा हजारे यांनी त्यांचे वकील मिलींद दत्तात्रय पवार यांच्या वतीने नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
    नोटीस पाठवून अण्णा हजारे यांची नवाब मलीक यांनी जाहीर लेखी माफी मागावी व तसा खुलासा करावा़ तसे न केल्यास फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे खटले व दावे मलिक यांच्या विरोधात दाखल करावे लागतील असा इशारा कायदेशीर नोटीस रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून मलिक यांना दिला आहे.

Web Title: Anna Hazare notice to Nawab Malik; If you do not give evidence then apologize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.