अण्णांची प्रकृती खालावली लोकमत न्यूज नेटवर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 03:34 AM2019-02-02T03:34:09+5:302019-02-02T03:34:21+5:30
शरीरातील साखर कमी झाली असून वजन तीन किलो शंभर ग्रॅमने घटले आहे
राळेगणसिद्धी (जि़ अहमदनगर) : उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा रक्तदाब कमी जास्त होत आहे. साखर कमी झाली असून वजन तीन किलो शंभर ग्रॅमने घटले आहे. हजारे यांची प्रकृती खालावल्याचे डॉ. धनंजय पोटे यांनी स्पष्ट केले.
उपोषणाच्या दुसºया दिवशी हजारे यांचे वजन दीड किलोने कमी झाले होते. शुक्रवारी उपोषणाच्या तिसºया दिवशी डॉ. पोटे यांच्यासह जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. हेमंत पालवे, डॉ. पोपट सोनवणे यांच्या पथकाने हजारे यांची सकाळी, दुपारी व रात्री हजारे यांची वैद्यकिय तपासणी केली.
विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांचाही पाठिंबा
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व अॅड. असीम सरोदे यांनी राळेगण सिद्धी येथे येऊन अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी अण्णांच्या तब्येतीची विचारपूस केली.