राष्ट्रवादीकडून अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन

By admin | Published: January 6, 2017 07:07 PM2017-01-06T19:07:07+5:302017-01-06T19:07:07+5:30

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याने जाळला अण्णांचा पुतळा

Anna Hazare's statue burnt by NCP | राष्ट्रवादीकडून अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन

राष्ट्रवादीकडून अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन

Next
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 6 - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याने प्रदेशाध्यक्ष संग्रामजी कोते-पाटील व जिल्हाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 
2 वर्षांत 2000 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, नोटबंदीनंतर 100 नागरिक मृत्यू पावले तेव्हा का हा अण्णा हजारे झोपला होता काय? पवार साहेब व अजितदादा पवार यांच्यावर टीका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कदापि सहन करणार नाही,  यानंतर अण्णा हजारेंना महाराष्ट्र भर फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी आण्णा हजारेंच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून गेला.
आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे यांनी केले.  यावेळी  प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक पवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष समाधान सुरवसे होते. या आंदोलनासाठी विद्यार्थी तालुकाध्यक्ष गणेश बनसोडे,  शहराध्यक्ष संकेत घोगरधरे, कार्याध्यक्ष सुजित गायकवाड, अक्षय कसबे, ओंकार वैरागकर, अजित खिलारे, सागर पडगळ, गौस करमाळकर, कुणाल हेळेकर, गजानन ननवरे, मोहित बनसोडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Anna Hazare's statue burnt by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.