बेदी, केजरीवालांसाठी अण्णा ‘नॉट रिचेबल’!
By Admin | Published: January 21, 2015 01:27 AM2015-01-21T01:27:36+5:302015-01-21T01:27:36+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या किरण बेदी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल या दोन माजी शिष्यांना ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी चार हात लांबच ठेवले अ
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या किरण बेदी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल या दोन माजी शिष्यांना ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी चार हात लांबच ठेवले असून ते फोनही त् घेत नसल्याचे समजते.
दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपावासी किरण बेदी या दोन अण्णांच्या माजी शिष्यमोत्तांमध्ये सामना रंगत आहे. ‘अण्णाजी का आशीर्वाद मिला है’, असे दोघेही सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र अण्णांनी स्वत:ला दिल्लीपासून दूरच ठेवले आहे. किरण बेदी भाजपामध्ये गेल्याचे अण्णांना रुचले नाही.भाजपात प्रवेश करण्यापूर्वी बेदी यांनी मला फोनवरून किंवा अन्य कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. आमच्या शेवटच्या आंदोलनानंतर त्या राळेगणसिद्धीतही आल्या नाहीत आणि त्यांनी कधी संपर्कही केला नाही, असे अण्णांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.
याबाबत बेदी म्हणाल्या अण्णांची फोनलाईन सध्या व्यस्त असून, ते माझे फोन घेत नाहीत. त्यांना जेव्हा कळेल की मी भाजपात का आली, तेव्हा ते फोन नक्की घेतील. तर केजरीवाल म्हणाले, अण्णांशी कोणतीच चर्चा झालेली नाही. पण त्यांचे आशीर्वाद जरूर घेईन. मला खात्री आहे, ते माझ्या डोक्यावर हात ठेवून एक सुखद संदेश साऱ्यांसाठी देतील. केजरीवाल यांनी दोन दिवसांत भरपूर वेळा राळेगणसिध्दीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अण्णांचे आशीर्वाद मिळावे म्हणून एकदा तरी बोलणे व्हावे यासाठी एका मध़्यस्थामार्फत चंग बांधला पण अण्णांनी दाद दिली नाही.