अण्णांचा मोदींवर हल्लाबोल!
By admin | Published: October 19, 2014 01:36 AM2014-10-19T01:36:47+5:302014-10-19T01:36:47+5:30
तुमच्या बोलण्यात अन् वागण्यात फरक असल्याचे यावरून दिसून येते, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Next
पारनेर (जि. अहमदनगर) : केंद्रात भाजपाला सत्ता मिळाल्यास 1क्क् दिवसांत परदेशातील काळा पैसा परत आणू तसेच भ्रष्टाचाराविरोधात लढाई करण्याची आपली घोषणा केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठीचे तंत्र होते का, असा सवाल करत तुमच्या बोलण्यात अन् वागण्यात फरक असल्याचे यावरून दिसून येते, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
विदेशी बँकेत काळा पैसा ठेवलेल्या भारतीयांची नावे उघड करता येणार नाहीत, अशी भूमिका शुक्रवारी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्या पाश्र्वभूमीवर अण्णा हजारे यांनी मोदींना खरमरीत पत्र लिहिले आहे. आपल्या अमेरिका, जपानमधील दौ:यातील भाषण ऐकल्यावर मी खूप प्रभावित झालो होतो. पण आता सांगताना दु:ख होतेय की आपल्या ‘कथनी व करणी’त बरेच अंतर आहे. सामाजिक प्रश्नांमध्ये तांत्रिक नव्हेतर नैतिकतेवर आधारित मुद्दय़ांना महत्त्व देणो आवश्यक आहे. सरकारपुढे कितीही तांत्रिक अडचणी आल्या तरी काळा पैसा जमा करून देशाशी बेईमानी करणा:यांची नावे तातडीने जाहीर झालीच पाहिजे. हे आपल्यासमोर आव्हान आहे. यासाठी आपल्यामागे देश उभा राहील, असेही अण्णांनी पत्रत नमूद केले आहे.
तुमच्याकडे सत्ता आहे, पण मी राष्ट्रप्रेम असलेला साधा फकीर आहे. मी देशासाठी सेवा करतानाच मरण्याचे ठरविले आहे. काळ्या पैशांचा मुद्दा महत्त्वाचा असून, या प्रश्नावर पुन्हा आंदोलन करण्यास तयार असल्याचे अण्णांनी पत्रत म्हटले आहे.
च्अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकपाल संदर्भात 28 ऑगस्टला पत्र पाठविले होते. त्यावर मोदी यांनी अद्यापही कोणतेच उत्तर दिलेले नाही. परदेशवारी व प्रचारानंतर मोदींना पत्र लिहिण्यास वेळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. आता दोन्ही प्रश्नांच्या एकत्रित विचारासाठी अण्णांनी पुन्हा पत्र पाठविले आहे.