भय्यूजी महाराजांवरील हल्ल्याबद्दल अण्णांना चिंता
By admin | Published: May 11, 2016 04:11 AM2016-05-11T04:11:32+5:302016-05-11T04:11:32+5:30
राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली.
पारनेर (जि. अहमदनगर) : राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी भय्यूजी महाराजांनी राळेगणसिद्धीत हजारे यांची भेट घेतली होती.
शनिवारी रात्री अण्णांची भेट घेतल्यानंतर भय्यूजी महाराज पुण्यात गेले. त्यानंतर रविवारी इंदूरकडे जात असताना नगर -पुणे महामार्गावर रांजणगाव परिसरात त्यांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. तर पहाटे मनमाडजवळ हल्ला झाल्याची तक्रार इंदूरमध्ये देण्यात आली. मात्र भय्यूजी महाराजांवर चोंडी घाटात हल्ल्याची घटना घडलेली नाही़, असे नाशिक पोलीस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले.