अण्णांची मध्यस्थी नाकारली!
By admin | Published: June 3, 2017 03:42 AM2017-06-03T03:42:27+5:302017-06-03T03:42:27+5:30
ख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी दुपारी चर्चेसाठी बोलावणे आल्यानंतर शेतकरी संपाचे सारथ्य करणाऱ्या किसान क्रांती समितीचे
दिलीप चोखर/ अजय जोर्शी/ लोकमत न्यूज नेटवर्क
राहाता /पुणतांबा : मुख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी दुपारी चर्चेसाठी बोलावणे आल्यानंतर शेतकरी संपाचे सारथ्य करणाऱ्या किसान क्रांती समितीचे सदस्य सायंकाळी मुंबईस रवाना झाले. दरम्यान, संपाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांची मध्यस्थी समितीने नाकारली.
मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर आंदोलनाच्या समन्वय समितीची बैठक झाली. संपाबाबत अण्णा हजारेंची मध्यस्थी नाकारण्यात आल्याचे सांगून ते भाजपाचे
समर्थक असल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला. अण्णा शेतकऱ्यांचे नाही, तर भाजपाचे समर्थक असून ते देवेंद्र व नरेंद्र
मोदींच्या मदतीला धावले आहेत. मध्यस्थी करायची होती, तर आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. बऱ्याच दिवसांपासून अण्णा बाजूला पडलेले होते. या माध्यमातून प्रकाशझोतात येण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सूर्यवंशी यांनी केली. अण्णाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत फेटाळल्याचे सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले.