आंबेडकर भवनला ऐतिहासिक वास्तू घोषित करा-गवई
By admin | Published: July 6, 2016 02:00 AM2016-07-06T02:00:34+5:302016-07-06T02:00:34+5:30
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या आंबेडकर भवनाला ऐतिहासिक वास्तू घोषित करून त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने उचलावी.
अमरावती : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या आंबेडकर भवनाला ऐतिहासिक वास्तू घोषित करून त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने उचलावी. तसेच सोशल मीडियावर आंबेडकर भवनाविषयी सुरू असलेली निंदा-नालस्ती थांबवून आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा, असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केले आहे.
रिपाइं ऐक्यासाठी सध्या तरी आशेचा किरण दिसत नाही. मात्र प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे यांनी पुढाकार घेतल्यास काही सकारात्मक मार्ग निघू शकेल. प्रसंगी रामदास आठवलेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. हीसुद्धा अट येऊ शकते, असेही राजेंद्र गवई यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांची कार्यशैली वेगळी असल्याचे त्यांनी मान्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये रिपाइं सोशल इंजिनिअरिंगवर भर देत उमेदवारांची निवड करेल, ही बाब गवई यांनी स्पष्ट के ली. काँग्रेसने परिस्थितीचे भान ठेवून मित्रपक्षांना राजकारणात स्थान देणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)