शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; अन्यथा रस्त्यांवर उतरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 05:07 AM2019-12-20T05:07:01+5:302019-12-20T05:07:26+5:30

प्रवीण दरेकर यांचा इशारा : राज्यपालांच्या अभिभाषणावर वादळी चर्चा

Announce assistance to farmers; Otherwise get on the streets | शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; अन्यथा रस्त्यांवर उतरू

शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; अन्यथा रस्त्यांवर उतरू

googlenewsNext

नागपूर : परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति हेक्टरी २५ हजारांची मदत तातडीने जाहीर करावी, अन्यथा रस्त्यांवर उतरू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी दिला.


माजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याकरिता १० हजार कोटींची घोषणा केली होती. परंतु हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याच्या माध्यमातून ४ हजार ५०० कोटी रु पयांची तुटपुंजी मदत करण्यात आली आहे.
नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. असे असतानाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा राज्यपालांच्या अभिभाषणात कोणताही उल्लेख नाही.
शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागणारे आज आराध्य दैवताला विसरल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
राज्यपालांच्या अभिभाषणात १० रुपयांची थाळी व १ रुपयात क्लिनिकची घोषणा स्तुत्य आहे. परंतु सद्यस्थितीत सार्वजनिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे आधी तालुकास्तरावर मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. राज्यात गँगवार वाढले आहे. गृहमंत्र्यांनी यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.


ग्रामीण भागाच्या विकासासोबत शहरी भागातील नागरिकांचा विकास योजनांच्या माध्यमातून विकास करणे गरजेचे आहे. मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मराठवाड्याचा समावेश राज्यापालांच्या अभिभाषणात करण्यात आलेला नाही. मराठवाड्यातील पाणी समस्या सोडविण्याची मागणी दरेकर
यांनी मांडली.

भ्रष्टाचार व मेगाभरतीमुळे भाजप सरकार गेले : शरद रणपिसे
भाजप हा धंदेवाईक पक्ष आहे. भ्रष्टाचार व मेगाभरतीमुळे राज्यातील भाजपची सत्ता गेल्याचा आरोप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला. राज्यकर्त्यांकडून चांगली वागणूक न मिळाल्याने लोकांनी भाजपला मतदान केले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जातीय राजकारण केले नाही. परंतु भाजप हा धंदेवाईक पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार भूमिपुत्रांना नोकरभरतीत ८० टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही : भाई गिरकर
प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आमचे आयकॉन आहेत. परंतु आजवरचा काँग्रेसचा इतिहास बघता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सहा-आठ महिने टिकेल, अशी टीका भाजपचे भाई गिरकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली. राज्य सरकारमध्ये कमीतकमी १२ मंत्री असायला हवे होते. परंतु सात जणांचाच समावेश आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचा समावेश नसल्याचे गिरकर यांनी सांगितले.
परिपूर्ण विचार करून कर्जमाफी करावी : जयंत पाटील
राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी परिपूर्ण विचार करून देण्यात यावी. गेल्या पाच वर्षात राज्यातील उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. साखर कारखाने अडचणीत आहेत. इथेनॉलच्या माध्यमातून साखर उद्योगाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवसंजीवनी दिली. कारखान्याकडील कर्जाचे पुनर्गठन होण्याची गरज असल्याची भूमिका शेकापचे जयंत पाटील यांनी मांडली.
कारशेडला दिलेली स्थगिती योग्यच :
मनिषा कायंदे
मुंबईतील कारशेडला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्यच असल्याचे शिवसेनेच्या सदस्य मनिषा कायंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार मिनीमम कॉमन प्रोग्रामनुसार गतीने सुरू आहे. कर्जमुक्ती व चिंतामुक्तीची घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचे त्यांनी सागितले.ॅ
महिलांवरील अत्याचार
रोखण्यासाठी काय : परिणय फुके
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत, असा सवाल फुके यांनी केला. गोदामात धान्य ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकºयांचा माल ठेवण्यासाठी जागा नाही. याला जबाबदार कोण, असा सवाल फुके यांनी अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला. विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासाचा समावेश नाही. भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष,महात्मा फुले जनआरोग्य साहाय्यता कक्ष बंद करण्यात आले आहे. मागच्या सरकारच्या अनेक चांगल्या योजनांना स्थगिती देण्यात आली. यातून विकास कसा होणार असा सवाल परिणय फुके यांनी केला.
आर्थिक स्थिती बिघडली : प्रकाश गजभिये
भाजप नेत्यांच्या अरेरावीमुळे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आले. केंद्र सरकारने जीएसटीच्या माध्यमातून राज्य सरकारला लुटले. राज्याच्या डोक्यावर सात लाख कोटींचे कर्ज असून आर्थिक स्थिती बिघडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. शेतकºयांना मदतीची मागणी करणाºया भाजप नेत्यांनी केंद्राकडून पैसा आणावा, डिजिटल इंडियाची घोषणा क रीत होता. आता कु ठे गेली ही योजना. १५ हजार कोटी सिंचनावर खर्च करणार होते. ५४ हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षण देणार होते या घोषणांचे काय झाले असा प्रश्न प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केला. भाजपने आंबेडकरी चळवळ उद्ध्वस्त के ल्याचा आरोप त्यांनी केला.
२० दिवसात कर्जमाफी कशी होणार? : भाई जगताप
राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांच्या काळात कर्जमाफी केली नाही अन् आता २० दिवसात कर्जमाफी कशी मागता असा सवाल काँग्रेसचे भाई जगताप यांनी केला. आठ लाख कोटींच्या मेक इन इंडिया योजनेची घोषणा केली त्याचे काय झाले, राज्यातील उद्योग बंद पडत आहेत. नोकºया कमी होत आहेत. महाविकास आघाडीने भूमिपुत्रांना नोकºयात ८० टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे जगताप यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सांगितले.

Web Title: Announce assistance to farmers; Otherwise get on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.