‘फळबागांसाठी पॅकेज जाहीर करा’

By Admin | Published: March 16, 2015 02:40 AM2015-03-16T02:40:33+5:302015-03-16T02:40:33+5:30

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी व वीज बिल माफी देऊन फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी पॅकेज

'Announce Package for Horticulture' | ‘फळबागांसाठी पॅकेज जाहीर करा’

‘फळबागांसाठी पॅकेज जाहीर करा’

googlenewsNext

आश्वी (अहमदनगर) : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी व वीज बिल माफी देऊन फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.
विखे यांनी रविवारी आश्वी, शिबलापूर, पानोडी, हाजरवाडी, पिंप्रीलौकी, आजमपूर, खळी या गावांना रविवारी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर विखे म्हणाले, महाराष्ट्राची स्थिती इतकी भक्कम आहे की, एकूण उत्पन्नाच्या ३२ टक्के कर्ज उचलण्याची परवानगी असताना आघाडी सरकारने एकदाही मर्यादेचे उल्लंघन केले नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी युती सरकारला इच्छाशक्तीची गरज आहे. जनतेने तुम्हाला ५ वर्षांसाठी निवडून दिले आहे. केंद्र सरकार तुमचे आहे. त्यांच्याकडे पैसे मागा, असे ते म्हणाले.

Web Title: 'Announce Package for Horticulture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.