दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By admin | Published: October 29, 2016 11:52 PM2016-10-29T23:52:02+5:302016-10-29T23:52:02+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक जाहीर

Announcement of Class XII, XII test | दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च तर दहावीची परीक्षा ७ मार्च ते २९ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास १५ दिवसांत विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, यंदा राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांचा अंदाज घेऊन मंडळाने परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कळविले जाणार आहे.
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून मंडळाकडून परीक्षेपूर्वी शाळा / महाविद्यालयांकडे पाठविले जाणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

दहावीचे परीक्षा अर्ज ४ नोव्हेंबरपासून
दहावीच्या परीक्षांचे आॅनलाइन परीक्षा अर्ज विद्यार्थ्यांना येत्या ४ नोव्हेंबरपासून नियमित शुल्कासह भरता येतील. २२ ते २८ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. सर्व विद्यार्थ्यांनी नियोजित कालावधीत आॅनलाइन परीक्षा अर्ज भरावेत, असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्मगाव नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना आधारकार्ड क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे.

दहावी परीक्षेच्या तारखा
विषयदिनांक
मराठी७ मार्च
इंग्रजी११ मार्च
गणित १ १४ मार्च
गणित २ १६ मार्च
विज्ञान १ १८ मार्च
विज्ञान २२० मार्च
सामाजिकशास्त्रे १ २१ मार्च
सामाजिक शास्त्रे २२२ मार्च

बारावी परीक्षेच्या तारखा
विषयदिनांक
इंग्रजी२८ फेब्रुवारी
मराठी२ मार्च
भौतिकशास्त्र ४ मार्च
गणित६ मार्च
रसायनशास्त्र ८ मार्च
जीवशास्त्र१० मार्च
राज्यशास्त्र ४ मार्च
इतिहास८ मार्च
अर्थशास्त्र१५ मार्च
भूगोल १७ मार्च

Web Title: Announcement of Class XII, XII test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.