दुष्काळाची घोषणा नव्या निकषानुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:36 AM2018-10-15T06:36:43+5:302018-10-15T06:37:11+5:30

अमरावती : राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पीक उत्पादनावर परिणाम झाल्याची कबुली देत यंदा नव्या निकषावर दुष्काळाची ...

The announcement of drought is on new criteria | दुष्काळाची घोषणा नव्या निकषानुसारच

दुष्काळाची घोषणा नव्या निकषानुसारच

Next

अमरावती : राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पीक उत्पादनावर परिणाम झाल्याची कबुली देत यंदा नव्या निकषावर दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते.


कुणाच्या मागणीनुसार अथवा अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार यापुढे दुष्काळ जाहीर केला जाणार नाही. नवीन नियमानुसार कार्यवाही केली जाईल. त्याचा आढावा घेतल्यानंतर ३१ आॅक्टोबरला टंचाईस्थिती जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापुढे शास्त्रीय पद्धतीनुसारच दुष्काळ जाहीर केला जाईल. पेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन याचा विचार नवीन नियमानुसार होईल. ३१ आॅक्टोबरनंतर टंचाईस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजनेचे निर्णय जाहीर केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जायकवाडीसाठी यंदाही पाणी सोडणार
नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ मराठवाड्याची तहान भागविणाºया जायकवाडी धरणात त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय आढावा बैठकीनंतर घेतला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. दिंडोरीरोडवर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी बांधलेल्या डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन केले.

Web Title: The announcement of drought is on new criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.