राज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 06:00 AM2018-10-24T06:00:11+5:302018-10-24T06:00:31+5:30

राज्यातील १८० तालुक्यांमध्ये तत्काळ दुष्काळसदृश स्थिती जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली.

Announcement of drought situation in 180 talukas in the state, Chief Minister announced | राज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये तत्काळ दुष्काळसदृश स्थिती जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. या तालुक्यांत कृषी कर्जवसुलीला स्थगिती व विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण करून ३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आधी घेतली होती; पण आज थेट हा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे १८० तालुक्यांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलातून सूट, कृषीकर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट, वीज खंडित न करणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट मिळेल. तसेच रोहयो कामांच्या निकषात सूट, टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हेही तालुक्यांमध्ये लागू झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात येईल आणि त्यानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल, असे ते म्हणाले. दुष्काळग्रस्त भागांत चारा छावण्या सुरू करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे ते म्हणाले.
दुष्काळग्रस्त तालुके
मराठवाडा : औरंगाबाद : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड. बीड : आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी, अंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा. हिंगोली : हिंगोली, कळमनुरी, सेनगाव. जालना : बदनापूर, घनसावगी, भोकरदन, जालना, परतुर. लातूर : शिरूर अनंतपाळ. नांदेड : मुखेड, उमरी, देगलुर. उस्मानाबाद : लोहारा. परभणी : पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू.
विदर्भ : अकोला : अकोला, बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर. अमरावती : अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरूड, अंजनगाव सुर्जी. भंडारा : लाखनी, मोहाडी, पवनी. बुलडाणा : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा, सिंदखेड राजा. चंद्रपूर : भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, राजुरा, सिंदेवाही, वरोरा. गोंदिया : देवरी, मोरगाव अर्जुनी, (पान १० वर)(पान १ वरून) सालेकसा. नागपूर : कळमेश्वर, काटोल, नरखेड. वर्धा : आष्टी, कारंजा, समुद्रपूर, वाशिम: रिसोड, यवतमाळ - बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, यवतमाळ.
उत्तर महाराष्ट्र : अहमदनगर : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड. धुळे : धुळे, शिरपूर, शिंदखेडा. जळगाव : अमळनेर, भडगाव, भूसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल. नंदुरबार : नंदुरबार, शहादा, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ - तळोदे. नाशिक : गंभीर स्वरूपाचा दुष्काळ - देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ -चांदवड.
पश्चिम महाराष्ट्र : कोल्हापूर : हातकणंगले, कागल, राधानगरी. पुणे : आंबेगाव, घोडेगाव, बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, सासवड, पुरंदर, शिरूर, वेल्हे, घोडनदी, घोडेगाव. सांगली : आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, पलूस, जत, खानापूर, विटा. सातारा : खंडाळा, मान दहीवडी, फलटण, कराड, कोरेगाव, वाई. सोलापूर : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ.
कोकण : पालघर : पालघर, तलासरी, विक्रमगड. रायगड : माणगाव, सुधागड, श्रीवर्धन. रत्नागिरी : मंडणगड. सिंधुदुर्ग, वैभववाडी.
>दुष्काळाऐवजी दुष्काळसदृश स्थिती जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारसदृश आभार !
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
>२०१६ च्या निकषांमुळे अनेक तालुके मदतीपासून वंचित राहणार आहेत. ते निकष रद्द होईपर्यंत शेतकºयांच्या पदरात काही पडणार नाही. त्यामुळे ही घोषणा फसवी आहे. - धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Web Title: Announcement of drought situation in 180 talukas in the state, Chief Minister announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.