शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, १८ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:40 AM2017-10-10T03:40:13+5:302017-10-10T03:40:33+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ नोव्हेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ नोव्हेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाही याच दिवशी घेतली जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२.३० यावेळेत प्रथम भाषा व गणित आणि दुपारी १.३० ते ३ या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in
www.puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.