राज्यातील विविध मंडळाच्या नियुक्त्या जाहीर; अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 08:26 PM2018-08-31T20:26:43+5:302018-08-31T20:30:02+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकास महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्ता राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकास महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्ता राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.
यामध्ये सत्ताधारी भाजपाने मित्रपक्षांना खुश करण्यासाठी अनेक नेत्यांच्या नियुक्त्या या विविध मंडळाच्या पदांवर केल्या आहेत. यामध्ये शिवसेनेसह अन्य मित्र पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.
महामंडळ / समिती
1) हाजी अरफात शेख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील, सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ
4) हाजी एस. हैदर आझम, अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
5) सदाशिव दादासाहेब खाडे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण
6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
7) संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार, उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
8) आशिष जयस्वाल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
9) प्रकाश नकुल पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ
11) जगदिश भगवान धोडी, उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
12) उदय सामंत, अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण
13) श्रीमती ज्योती दिपक ठाकरे, अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ
14) विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ
15) विजय नाहटा, सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ
16) रघुनाथ बबनराव कुचिक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ
17) मधु चव्हाण, अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
18) संदिप जोशी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ
19) प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ
20) मो. तारिक कुरैशी, अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
21) राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ