बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक, ओखीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 11:52 PM2017-12-22T23:52:47+5:302017-12-22T23:53:08+5:30

राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत मदत जाहीर केली.

Announcing help to the farmers affected by paddy crop, paddy growers, drought-hit farmers | बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक, ओखीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक, ओखीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

googlenewsNext

 नागपूर - राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत मदत जाहीर केली. भात उत्पादक शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते २३ हजार २५० रुपये इतकी मदत मिळणार आहे. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये इतकी मदत मिळणार आहे, अशी महिती मंत्री श्री. फुंडकर यांनी दिली.

या मदतीविषयी सविस्तर माहिती देताना मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, कोरडवाहू भात उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये तर पीक विम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण ७ हजार ९७० रुपये मदत मिळेल. बागायत भात पीकास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये तर पीक विम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण १४ हजार ६७० रुपये मदत बागायत भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मिळेल. तसेच नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेसाठी एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये तर विम्यांतर्गत ९ हजार ७५० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण २३ हजार २५० रुपये मदत नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेस मिळेल. भाताच्या नापेर क्षेत्रासाठी पीक विम्यांतर्गत ९ हजार ७५० रुपये मदत देण्यात येईल. धानाला २०० रुपये प्रति क्विंटल बोनस दिला जाईल. हा बोनस ५० क्विंटलच्या मर्यादेत दिला जाईल, अशी घोषणाही मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी केली.

कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३० हजार ८०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३७ हजार ५०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. कापसाची मदत ही २ हेक्टरपर्यंत देण्यात येईल.

ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पिकांच्या नुकसानीबाबतही मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी मदत जाहीर केली. फळ पीकांसाठी एनडीआरएफमार्फत १८ हजार रुपये तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत ९ हजार ते २५ हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. अशी एकुण साधारण ४३ हजार रुपयांपर्यंतची मदत ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पीकांसाठी दिली जाईल. तसेच ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या भाजीपाल्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये इतकी मदत दिली जाईल, असे मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी जाहीर केले.
 

Web Title: Announcing help to the farmers affected by paddy crop, paddy growers, drought-hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.