‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांना जाहीर

By admin | Published: December 28, 2016 01:30 AM2016-12-28T01:30:09+5:302016-12-28T01:30:09+5:30

नागभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Announcing the 'Nagabhushan Award' to the Chief Minister | ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांना जाहीर

‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांना जाहीर

Next

नागपूर : नागभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नागभूषण फाउंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी यांनी मंगळवारी ही घोषणी केली. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, या वेळी उपस्थित होते.
मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर फडणवीस यांच्या रूपाने राज्याला विदर्भाचा मुख्यमंत्री मिळाला आहे, त्यांनी कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली, असे डॉ. गांधी यांनी सांगितले. पुरस्काराचे वितरण १ जानेवारी १०१७ रोजी राष्ट्रभाषा संकुलातील साई सभागृहात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Announcing the 'Nagabhushan Award' to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.