UPSC चा निकाल जाहीर, नंदिनी के. आर. देशात पहिली
By Admin | Published: May 31, 2017 08:22 PM2017-05-31T20:22:20+5:302017-05-31T22:02:57+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत नंदिनी के. आर हिने देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत नंदिनी के. आर हिने देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रातून अव्वल असून ती अकरावा क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2016 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये नंदिनी के. आर. ही देशात पहिली आली असून दुसऱ्या क्रमांकावर अनमोल शेर सिंह बेदी आणि तिसऱ्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनंकी आला आहे. तर, महाराष्ट्रातून विश्वांजली गायकवाडने अकरावा क्रमांक पटकावला आहे. याचबरोबर स्वप्निल खरे 43 वा, तर स्वप्निल पाटील याने 55 वा क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदासांठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत 1099 उमेदवारांना यश मिळाले आहे. यंदाच्या निकालात महाराष्ट्रालाही मोठे यश मिळाले आहे.
यश मिळवलेले महाराष्ट्रातील उमेदवार...
विश्वांजली गायकवाड (11), स्वप्निल खरे (43), स्वप्निल रविंद्र पाटील (55), भाग्यश्री दिलीप विसपुते (103), प्रांजल लहेनसिंग पाटील (124), सुरज अनंता जाधव (151), स्नेहल सुधाकर लोखंडे (184), अनुज मिलिंद तारे (189), विदेह खरे (205), राहुल नामदेव धोटे (209)अंकिता धाकरे (211),योगेश तुकाराम भारसट (215)...
This is a very happy moment for me, I have realized my dream: Nandini KR, #UPSC topper pic.twitter.com/jlDtbqRp0w
— ANI (@ANI_news) May 31, 2017