रेल्वेमधील गुन्ह्यांच्या प्रमाणात वर्षागणिक वाढ
By Admin | Published: July 12, 2014 01:07 AM2014-07-12T01:07:33+5:302014-07-12T01:07:33+5:30
2013 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
नवी दिल्ली : रेल्वेतील गुन्ह्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून 2क्13 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी रेल्वेतील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले होते. रेल्वेत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याची सरकारला कल्पना आहे काय, असा प्रश्न विचारत खा. दर्डा यांनी दरवर्षी सुमारे 19,क्क्क् गुन्हे घडत आहेत. हे प्रमाण त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
त्यावर गौडा म्हणाले की, आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के गुन्हे वाढतात, असे म्हणणो चुकीचे आहे. तथापि, 2क्13 मध्ये 21.5 टक्के गुन्हे वाढले. त्याबाबत त्यांनी सविस्तर आकडेवारीही दिली. 2क्11 मध्ये 22,493, 2क्12 मध्ये 21,775 आणि 2क्13 मध्ये 26,467 गुन्ह्याच्या घटना घडल्या. (यामध्ये अनुक्रमे 14,7क्1, 14,267 आणि 18,क्37 चोरीच्या घटनांचाही समावेश आहे.)
भारतीय रेल्वेतील गुन्हे रोखणो आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट रेल्वे प्रोटेक्शनची (जीआरपी) आहे, असे त्यांनी नमूद केले. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) काही महत्त्वाच्या गाडय़ांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाचे आणि संवेदनशील स्थानकांवरील बंदोबस्तासाठी जीआरपीला पूरक ठरत असते. महिलांसंदर्भातील गुन्हे वाढत आहेत. एकटय़ादुकटय़ा महिलेला रेल्वेतून प्रवास करण्यास कठीण झाले आहे काय, आणि असे असेल तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने कोणते उपाय योजले आहेत, यावर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे गाडय़ांमध्ये महिलांवरील गुन्हे वाढल्याची कबुली दिली; मात्र रेल्वेतून महिलांना एकटय़ाने प्रवास कठीण झाले आहे, असे म्हणणो चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)