अशोकराव माने फार्मसी कॉलेजमध्ये वार्षिक नियतकालीकाचे प्रकाशन
By admin | Published: May 6, 2014 06:51 PM2014-05-06T18:51:28+5:302014-05-06T22:05:11+5:30
अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव येथे अंतिम वर्ष पदवी व पदव्युत्तर पदवीचा निरोप समारंभ उत्साहात झाला.
खोची : अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव येथे अंतिम वर्ष पदवी व पदव्युत्तर पदवीचा निरोप समारंभ उत्साहात झाला.
यावेळी जी-पॅट २०१४ परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए. एम. खडतरे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर व संस्थेचे संचालक बाळासाहेब घोटणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे नियतकालिक क्षितीज २०१४ व वार्षिक अहवाल एएमसीपी बुलेटीनचे प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:चे सुप्त गुण ओळखून त्यानुसार आपले करिअर निवडावे, आत्मविश्वासही वाढवावा, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे ए. एम. खडतरे यांनी मार्गदर्शन केले.
बेस्ट ऑऊटगोईंग स्टुडंट म्हणून रविंद्र गायकवाड अंतिम वर्ष पदवी ाची निवड करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. सचिन कुंभोजे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. निसार शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वार्ताहर