आणखी १४ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:07 AM2018-06-25T06:07:40+5:302018-06-25T06:08:58+5:30

तर याचदिवशी महासंचालक कार्यालयाने ६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

Another 14 deputy superintendents of police, | आणखी १४ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या'

आणखी १४ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या'

Next

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्याची प्रतीक्षा असताना, राज्यातील १४ उपअधीक्षक/सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबईत दोन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यामध्ये सहा जणांची पूर्वीची ठिकाणे बदलून त्यांना सोयीच्या ठरणाºया ठिकाणी पदस्थापना करण्यात आली आहे. गृहविभागातर्फे शुक्रवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले, तर याचदिवशी महासंचालक कार्यालयाने ६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.
सहायक आयुक्तपदी पदोन्नतीनंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शरद नाईक व पांडुरंग शिंदे यांची मुंबई आयुक्तालयात निवड करण्यात आली आहे. अन्य अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठे): अनिलकुमार लंभाते (पुणे ग्रामीण), डॉ. सागर कवडे (सोलापूर), डॉ रणजीत पाटील (खालापूर, रायगड), नीता पाडवी (ठाणे शहर), शेख नजीर अब्दुल रहेमान (चाळीसगाव), अजय कदम (नवी मुंबई), शिवाजी जाधव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुधाकर यादव (राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे), अनुराधा गुरव (उस्मानाबाद), अनिकेत भारती (मिरज), विजय पांढरपट्टे (रायगड), सुनील जायभाये (भोकरदन).

कौटुंबिक कारणास्तव मुंबईत बदलीची विनंती करूनही ती होत नसल्याने, आत्महत्या करण्याचा इशारा दिलेल्या हिंगोलीच्या उपअधीक्षका सुजाता पाटील यांच्याबाबत गृहविभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
गेल्या दोन वर्षांपासून बदलीच्या प्रयत्नात असलेल्या पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री, महासंचालक, विशेष महानिरीक्षकांना वारंवार अर्ज दिले आहेत. त्याबाबतची व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, गृहविभागाने अद्याप त्यांच्या विनंतीचा विचार केलेला नाही.

Web Title: Another 14 deputy superintendents of police,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.