तलावात आणखी दीड महिन्यांचा जलसाठा
By Admin | Published: June 17, 2016 05:24 PM2016-06-17T17:24:37+5:302016-06-17T20:16:20+5:30
तलावात आणखी दीड महिन्यांचा जलसाठा मुंबई जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त न चुकविणाºया पावसाचे वेळापत्रकच गेल्या काही वर्षांत बिघडले आहे़ यंदा चांगला पाऊस असल्याचा दिलासा हवामान खात्याने दिला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : तलावात आणखी दीड महिन्यांचा जलसाठा मुंबई जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त न चुकविणाºया पावसाचे वेळापत्रकच गेल्या काही वर्षांत बिघडले आहे़ यंदा चांगला पाऊस असल्याचा दिलासा हवामान खात्याने दिला, तरी अद्याप मान्सून मुंबईत फिरकलेला नाही़ तरीही तलावांमध्ये असलेला जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल, असा दिलासा पालिका प्रशासनाने दिला आहे़ गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे मुंबईत वर्षभर १५ टक्के पाणीकपात सुरु आहे़ त्यामुळे दररोज ३७५० ऐवजी ३२०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे़ या बचतीमुळे अद्याप तलावांमध्ये आजच्या घडीला एक लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा शिल्लक आहे़ याचा आढावा पालिकेच्या स्थायी समितीने आज घेतला़ मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते़ जूनचा पंधरवडा उलटला तरी अद्याप पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावलेली नाही़ मात्र आजच्या घडीला वैतरणा नदीच्या स्त्रोतांमध्ये २८ दिवस व भातसा धरणात १६ दिवसांचा जलसाठा शिल्लक असल्याचे प्रशासनाने आज सांगितले़ प्रतिनिधी
जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलाव-कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३़१५१४३़२६ १४५़७७तानसा१२८़६३ ११८़८७ १२०़९१ विहार८०़१२ ७३़९२ ७४़७१ तुळशी१३९़१७ १३१़०७ १३४़१४ अप्पर वैतरणा ६२७़१७६१९़९ ५९५़०८ भातसा१६६़५३ १२९़३६ १०७़९१ मध्य वैतरणा २८५़००२२०़०० २४५़४४ एकूण २०१६ -१०८३२८ दशलक्ष लीटर २०१५- १८८४१० दशलक्ष लीटर