आणखी २०० रस्त्यांची चौकशी

By Admin | Published: April 27, 2016 06:19 AM2016-04-27T06:19:33+5:302016-04-27T06:19:33+5:30

दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील चौकशी पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे़

Another 200 road investigations | आणखी २०० रस्त्यांची चौकशी

आणखी २०० रस्त्यांची चौकशी

googlenewsNext

मुंबई : रस्त्यांच्या चौकशीत सरासरी ५३ टक्के कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यानंतर, दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील चौकशी पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे़ यामध्ये दोनशे रस्त्यांची पाहणी करून कामाचा दर्जा तपासण्यात येणार आहे़ त्यामुळे या घोटाळ्यातून आणखी काही मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे़
खड्डेमुक्त मुंबईसाठी अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आऱ श्रीनिवास यांनी साडेसात हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा मास्टर प्लॅन तयार केला होता़ मात्र, या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आल्यानंतर, आयुक्त अजय मेहता यांनी हा मास्टर प्लॅन गेल्या वर्षी रद्द केला़ आॅक्टोबर २०१५ मध्ये महापौर स्नेहल आंबेकर यांच्या मागणीनुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली़
या समितीने ११५ पानांच्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या़ ठेकेदारांचे हित जपण्यासाठी निविदेतील निकषांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी ठेवण्यात आल्याकडे समितीने लक्ष वेधले़ त्याचबरोबर, ठेकेदार, अधिकारी व थर्ड पार्टी आॅडिटरवर कारवाईची शिफारस करीत तशी प्रक्रियाही सुरू करण्यात आली़ याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चौकशीचा दुसरा टप्पा पुढच्या आठवड्यात सुरू करण्याचा निर्णय झाला़ (प्रतिनिधी)
>पहिल्या टप्प्यातील चौकशीतून कारवाई
के़ आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन हे ठेकेदार आणि थर्ड पार्टी आॅडिटर एसजीएस आणि आयआरएस या कंपनीला काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे़
रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यात रस्ते व दक्षता खात्यातील अधिकारी अपयशी ठरले आहेत़ या घोटाळ्यात दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता, प्रमुख अभियंता असे मोठ्या प्रमाणात अधिकारी गुंतले आहेत़
सर्वप्रथम रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ मात्र, मुरुडकर यांना नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे़
>विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
च्या घोटाळ्यात सत्ताधारी शिवसेनेचाही हात असण्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे़ या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांचीही चौकशी करण्याची मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आज केली़ रस्त्यांच्या या प्रस्तावांना विरोध केल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी हे प्रस्ताव मंजूर केले़
च्त्यामुळे या घोटाळ्यासाठी ते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला़, तर या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखाकडे सोपविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली आहे़ अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांचीही या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केली आहे़
>चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात काय?
च्या घोटाळ्यामध्ये ठेकेदारांपासून, अधिकारी व थर्ड पार्टी आॅडिटरही गुंतले असल्याचे पहिल्या टप्प्यातील चौकशीत उजेडात आले़ रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकारी यात गुंतले असल्याने, त्यांची जबाबदारी आता निश्चित करण्यात येणार आहे़
च्त्याचबरोबर, आणखी दोनशे रस्त्यांच्या कामांची छाननी होणार आहे़ त्यामुळे सुमारे तीन हजार कोटींच्या या घोटाळ्यातून आणखी काही धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे़ २०१३ ते २०१५ मध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशीही यात होणार आहे़

Web Title: Another 200 road investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.