मान्सूनसाठी आणखी ७२ तासांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 08:24 AM2023-06-22T08:24:08+5:302023-06-22T08:24:19+5:30

महाराष्ट्रात २३, २४, २५, २६ जून रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाची आशा आहे.

Another 72 hours wait for Monsoon | मान्सूनसाठी आणखी ७२ तासांची प्रतीक्षा

मान्सूनसाठी आणखी ७२ तासांची प्रतीक्षा

googlenewsNext

मुंबई : मान्सून कधी येणार, याकडे सर्वांचेच डोळे लागले असून अजून त्यासाठी किमान ७२ तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अरबी समुद्रात थंडावलेली मान्सूनची शाखा उर्जितावस्थेत येईल. परंतु, सुरुवातीला तिचा जोर कोकणातच अधिक तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यांत सध्या तरी काहीसा कमी असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्रात २३, २४, २५, २६ जून रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाची आशा आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक म्हणून मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्हे व गोव्यात तसेच विदर्भातही २२ जून व त्यापुढील पाच दिवस म्हणजे २६ जूनपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. 

Web Title: Another 72 hours wait for Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस