मुंब्य्रातील आणखी एक पकडला

By admin | Published: January 31, 2016 03:25 AM2016-01-31T03:25:55+5:302016-01-31T03:25:55+5:30

इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेख याच्या मुंब्रा येथून मुसक्या आवळल्यानंतर मुंब्य्रातील आणखी एकाचे इसिसशी कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Another caught in Mumbra | मुंब्य्रातील आणखी एक पकडला

मुंब्य्रातील आणखी एक पकडला

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेख याच्या मुंब्रा येथून मुसक्या आवळल्यानंतर मुंब्य्रातील आणखी एकाचे इसिसशी कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून सौदी अरेबियाने हाकलून लावलेल्या तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले असून, त्यात मुंब्रा येथील मोहम्मद फरहान मोहम्मद रफीक शेख याचा समावेश आहे.
इंटरनेटद्वारे इसिसच्या अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून मोहम्मद फरहान याच्यासह जम्मू-काश्मीर येथील शेख अजहर अल इस्लाम अब्दुल सत्तार आणि हैदराबादचा अदमान हुसेन मोहम्मद हुसेन ऊर्फ अदनान दमुदी या इसिसच्या कथित संशयित अतिरेक्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, देशविघातक कृत्य करण्याच्या आरोपांखाली शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश एनआयएच्या न्यायालयाने दिले आहेत.
इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेखला पकडल्यानंतर मोहम्मद फरहान शेख हा मुंब्रा येथील दुसरा संशयित अतिरेकी ठरला आहे. मोहम्मद फरहानच्या आईचे लहानपणीच निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे आजीनेच त्याचा सांभाळ केला. आपला नातू ‘इसिस’च्या मार्गावर गेल्याची माहिती तिला एनआयएकडून समजल्यानंतर धक्काच बसला. घरी आलेल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तिला रडूच कोसळले. मुंब्य्रातील एका साध्या घरात ही वयोवृद्ध महिला वास्तव्यास आहे. मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेतल्यानंतर फरहान चांगल्या नोकरीसाठी तीन वर्षांपूर्वीच परदेशी (सौदी अरेबिया) गेला होता. सौदीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला लागल्यानंतर त्याला लॅपटॉपही मिळाला होता. मात्र, लॅपटॉपवरूनच तो फेसबुकच्या माध्यमातून इसिससाठी काम करीत असल्याचे सौदी सरकारच्या निदर्शनास आले.

Web Title: Another caught in Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.