टिटवाळ्यात डेंग्यूचा आणखी एक रूग्ण
By admin | Published: October 24, 2016 04:51 PM2016-10-24T16:51:38+5:302016-10-24T16:51:38+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील टिटवाळा येथील डेंग्युची लागण झालेला रूग्ण आढळून आला. त्याच्यावर कल्याण येथील आयूष या खासगी रूग्णालयात उपचार सुरू
ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. 24 - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील टिटवाळा येथील डेंग्युची लागण झालेला रूग्ण आढळून आला. त्याच्यावर कल्याण येथील आयूष या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील हरिओम व्हॅली सोसायटी रहाणारे तीस वर्षीय तरूण अशोक डोंगरे यांना डेंग्यूची लागण झाली आहे.
अशा प्रकारचे रूग्ण टिटवाळ्यात आता पर्यंत बरेच आढळून आले. याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छतेचा अभाव, जागोजागी गटारे तुंबलेल्या, चौका चौकात कचर्याचे ढिगारे, किटक नाशकांची फवारणी वेळेवर न होणे, सांड पाण्याचा निचरा आदी विविध समस्या टिटवाळा शहरात आवासून उभ्या राहिल्या आहेत. या कारणास्तव या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, ताप व खोकला अशा प्रकारच्या साथीच्या रोगांना येथील जनतेला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवापासून याठिकाणी टायफॉईड, डेंग्यू व मलेरियाचे बर्यापैकी रूग्ण आढळून आले. कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभाग या बाबीकडे गंभिरपणे आपले लक्ष केंद्रित करून यावर नियोजन करण्यात यशस्वी होईल का असा सवाल येथील जनतेतून उपस्थित करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे पत्रीपूल येथील कृष्णानगरमध्ये राहणार्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू त्या प्रमाणे टिटवाळ्यात एखादी घटना घडल्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करेल का ? असा संतप्त सवाल देखील नागरिक करत आहेत.