नाशिक पोलीस अकादमीत आणखी आठ निरीक्षक
By admin | Published: July 10, 2017 05:37 AM2017-07-10T05:37:37+5:302017-07-10T05:37:37+5:30
प्रशिक्षण केंद्र असलेल्या नाशिक पोलीस अकादमीमधील निरीक्षक दर्जाची आणखी आठ पदे वाढविण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलीस दलात भरती झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या नाशिक पोलीस अकादमीमधील निरीक्षक दर्जाची आणखी आठ पदे वाढविण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या तुलनेत अपुऱ्या प्रशिक्षकांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या उमेदवारांना खात्यात रुजू होण्यापूर्वी नाशिक पोलीस अकादमीमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या ठिकाणी उपलब्ध प्रशिक्षणाच्या तुलनेत अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने लातूर, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्र व नाशिक पोलीस आयुक्तालयात मंजूर असलेल्या मनुष्यबळातून १० निरीक्षकांची पदे नाशिक पोलीस अकादमीमध्ये
वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.