आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: April 21, 2016 03:20 AM2016-04-21T03:20:05+5:302016-04-21T03:20:05+5:30
सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर येथील विठ्ठल संतराम गुंड्डावार (४५) या शेतकऱ्याने बुधवारी दुपारी
चापोली (जि. लातूर)/ आलेगाव (जि. परभणी) : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.
चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर येथील विठ्ठल संतराम गुंड्डावार (४५) या शेतकऱ्याने बुधवारी दुपारी स्वत:च्या शेतातील बाभळीच्या झाडास गळाफास घेऊन आत्महत्या केली़ गुंड्डावार यांना एक एकर कोरडवाहू शेती आहे़ दोन वर्षांत शेतीतून उत्पन्न निघाले नाही़ खाजगी सावकारी कर्ज काढून गेल्यावर्षी एका मुलीचा विवाह केला़ नापिकीमुळे ते चिंतेत होते.
> ४दुसरी घटना परभणी जिल्ह्यात घडली. पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची पत्नी कमलबाई त्र्यंबक घाटोळ (३६ ) यांनी विष प्राशन केल्याची घटना १२ एप्रिल रोजी घडली होती. उपचारादरम्यान हिचा १३ एप्रिल रोजी मृत्यू झाला.
४आलेगाव सवराते येथील त्र्यंबक घाटोळ यांच्या नावे असलेल्या शेतीवर युनियन बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक कावलगाव व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आलेगाव या बँकेचे कर्ज आहे. मागील वर्षी मुलीचे लग्न झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना खाजगी देणे झाले होते. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातू असा परिवार आहे.
> ४केज (जि. बीड) : तालुक्यातील पळसखेड येथे रामचंद्र गुलाब अडागळे (४०) या मजुराने मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून मंगळवारी रात्री आपली जीवनयात्रा संपवली. त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. ते भूमिहिन आहेत. ते पत्नीसह मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत. मात्र, दुष्काळामुळे कामधंदाही मिळत नव्हता. त्यामुळे ते बेचैन होते. त्यांच्या दोन मुली उपवर झाल्या होत्या. त्यामुळे रामचंद्र यांना त्यांच्या लग्नाची चिंता होती. मंगळवारी घरातील सर्व मंडळी नातेवाईकाच्या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेली असताना त्यांनी घराच्या आडूला दोरीने गळफास घेतला