पाटोद्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: June 11, 2017 09:45 PM2017-06-11T21:45:01+5:302017-06-11T21:45:01+5:30

विदर्भ मराठवाडा येथील शेतकरी आत्महत्येचे लोण आता येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पोहोचले आहे. येथील अमीर लतिफ चौधरी (५५) या

Another farmer suicides in Patiala | पाटोद्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

पाटोद्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
 नाशिक, दि. 11 - विदर्भ मराठवाडा येथील शेतकरी आत्महत्येचे  लोण आता येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पोहोचले आहे. येथील अमीर लतिफ चौधरी (५५) या शेतकऱ्याने  नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली  जीवन यात्रा संपविली. शेतकरी आत्महत्येची  या परिसरातील आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने पाटोदा परिसरात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चौधरी यांनी आपल्या खिशात तशा प्रकारची चिट्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले. कर्जमाफीची घोषणा होण्याच्या काही काळ अगोदरच या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
 चौधरी यांनी आज दि 11  मे रोजी सायंकाळी चार पाच वाजेच्या सुमारास आपल्या शिरसगाव रोड वरील शेतात कांद्याच्या चाळीजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे चौधरी यांच्या नावावर दोन  पावणेदोन एकर च्या आसपास शेती असून शेतीसाठी त्यांनी पाटोदा सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहे. गेल्या तीन चार वर्षापासून नापिकी तसेच शेतीपिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. या वर्षात नवीन शेतीसाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे प्रपंच्याचा रोजचा खर्च कसा भागवायचा या वैफल्यग्रस्त मनस्थितीतून जीवनयात्रा संपविली .घटना स्थळी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार,उगलमुगले,विजय जाधव संजीवकुमार मोरे यांनी येवून पंचनामा केला.
 आत्महत्या करण्यापुर्वी चिट्ठीत लिहून ठेवलेला मजकूर
सोसायटी कर्ज , वीजबिल, घरखर्च यासाठी लोकांचे घेतलेले पैसे या वर्षी शेतीसाठी लागणारे भांडवल कसे करायचे अशा विचारांनी काहूर केले. शेतीमालाला नसलेला भाव , दोन वर्षापासून नापिकी, जगायचे कसे?  शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्यायाच नाही. माझ्या या निर्णयाला मी ठाम झालो. यामध्ये माझ्या कुटुंबातील अथवा नातलग किवा शेजारी पाजारी कुणाचाही दोष नाही. हा मी घेतलेला ठाम निर्णय आहे. माझ्या मृत्यूमुळे कुणालाही त्रास होऊ नये.                        

Web Title: Another farmer suicides in Patiala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.