पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा! चोराला सोडविण्यासाठी डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:27 PM2024-07-12T14:27:17+5:302024-07-15T14:52:55+5:30

Pooja Khedkar Latest News: पूजा यांनी डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचे समोर येत आहे.

Another feat of IAS Pooja Khedkar! Call a DCP rank officer to rescue the thief; Report to Sujata Sounik by Navi mumbai Police | पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा! चोराला सोडविण्यासाठी डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला केला फोन

पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा! चोराला सोडविण्यासाठी डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला केला फोन

एका ट्विटमुळे आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. आता मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे एक अहवाल पाठविला असून यात पूजा यांनी डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचे समोर येत आहे. एका चोराला सोडविण्यासाठी पूजा यांनी या पोलीस अधिकाऱ्याला फोन करून दबाव टाकण्याचा प्रतत्न केल्याचे यात म्हटले आहे. 

पूजा खेडकरांची ऑडी कार कोणाची? रातोरात बंगल्याच्या आवारातून पजेरोही गायब झाली

हे प्रकरण खूप जुने नाही तर १८ मे रोजीचेच आहे. पनवेल पोलीस ठाण्यात चोरीच्या आरोपीला पोलिसांनी पकडले होते. तेव्हा पूजा यांनी कथितरित्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन केला आणि अटकेत असलेल्या ट्रान्सपोर्टर इश्वर उत्तरवाडे याला सोडण्यास सांगितले होते. 

एवढेच नव्हे तर पूजा खेडकर यांनी तो आरोपी निर्दोष असल्याचेही म्हणत त्याच्याविरोधातील आरोप किरकोळ असल्याचे पानसरेंना म्हटले होते. खरेतर पूजा यांनी फोनवर पानसरेंना आपली ओळख सांगितली, परंतू पानसरेंना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. यामुळे पोलिसांना या कॉलवर कोणतीही कारवाई केली नव्हती. हा उत्तरवाडे आजही न्यायालयीन कोठडीत आहे. 

पूजा खेडकर यांचे कारनामे उघड होऊ लागल्यावर पानसरे यांना या फोन कॉलची आठवण झाली. त्यांनी लगेचच पुण्याचे जिल्हाधिकारी आणि गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून याची माहिती दिली. त्या अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार पानसरेंनी कथित फोन कॉलवरून दोन पानांचा अहवाल मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पाठविला आहे. सौनिक यांच्याकडे सध्या गृह विभागाचा अतिरिक्त प्रभार आहे.

Web Title: Another feat of IAS Pooja Khedkar! Call a DCP rank officer to rescue the thief; Report to Sujata Sounik by Navi mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.