सोलापूरात दुसरे ग्रीन कॉरिडोर यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 02:45 PM2017-09-14T14:45:47+5:302017-09-14T14:56:04+5:30
सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातुन गुरूवार एका मुलाचे ह्दय व किडनी काढून त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी पुण्याला तातडीने पाठविण्यात आले.
आॅनलाइन लोकमत : अमित सोमवंशी/ विलास जळकोटकर
सोलापूर दि १४ : सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातुन गुरूवार एका मुलाचे ह्दय व किडनी काढून त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी पुण्याला तातडीने पाठविण्यात आले. या प्रक्रियेत एकक सेंकदाला महत्त्वाचा असल्याने पोलीस आयुक्तालयाने आपली यंत्रणा गतिमान करुन ज्या मार्गावरुन ही अवयवदान वहन करणारी वाहने जाणार होती त्या मार्गावरुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात सकाळी नऊ वाजल्या पासून लावण्यात आला होता. यात नऊ पोलीस अधिकाºयासह १२० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सकाळी ७ ते दुपारी १.३० अशी तब्बल साडेसहा तास ‘ग्रीन कॅरिडोर आॅपरेशन’ मोहीम फत्ते केली.
ग्रीन कॉरिडोर आॅपरेशनची कल्पना पोलीसांना बुधवारी रात्री दहा वाजता मिळाली होती. त्यानुसार आखलेल्या नियोजनानुसार पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिव्हील रुग्णालय ते विमानतळ या मार्गावरची वाहतूक काही काळ थांबवुन रुग्णवाहिकेला पोलिसांनी रस्ता मोकळा करुन दिला. त्यामुळेच रुग्णवाहिका काही मिनिटाच्या कालावधीत विमानतळावर यशस्वीरित्या पोहचली. विमानाव्दारे काही अवयव तर रुग्णवाहिकेव्दारे काही पुण्याला पाठविण्यात आले. तर रुग्णवाहिकेला सोलापूर शहराच्या बाहेर जाण्यापर्यंत पोलिसांनी बंदोबस्त व वाहतुक मार्ग सोईस्कर करुन दिल्याचे सहायक पोलीस आयुक्त (वाहतुक ) वैशाली शिंदे यांनी सांगितले.
या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे सकाळ पासून दीड वाजेपर्यंत रस्त्यावर थांबून होत्या़ सोलापूर शासकीय रुग्णालय ते विमानतळापर्यंत रुग्णवाहिकेला येण्यासाठी ६ मिनिट ५४ सेंकदाचा कालावधी लागला. रुग्णवाहिका विमानतळावर आल्यानंतर एका खासगी विमानाने ‘हृदय अवयव’ पुण्यास पाठविण्यात आले. अन्य अवयव रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले. दुसºया ठिकाणी अवयव नेताना सहा तासांच्या आत गेले पाहिजे वाहतुकीची अडचण येऊ नये यासाठी पोलिसांनी संबंधित मार्गावर ग्रीन कॉरिडोर आॅपरेशन राबविले.
शहर पोलीसांची सतर्कता़....
विमानतळावर सातही पोलीस ठाणे व वाहतुक शाखेचे पोलीस अधिकारी होते. विमानतळावर आसरा चौक, सिव्हिल हॉस्पीटल या मार्गावर सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे या देखरेख करत होत्या. पोलीस निरीक्षक जाधव, सहायक पोलीस निरीक्षक चौगुले, पोलीस निरीक्षक काने, पोलीस उपनिरीक्षक चवरे, पोलीस उपनिरीक्षक चवरे, यांच्या पथकाने रुग्णालयातुन येथून हृदय घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करुन दिला़ एरव्ही या रस्त्यावरुन ऊस वाहतूक करणारी जड वाहने, वाळू आणि इतर वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांची वर्दळ असते़ विमानतळावर थांबलेल्या पोलिसांच्या वॉकीटॉकीवरुन सतत सूचना येत होत्या़ अॅम्ब्युलन्स निघाली, विमानतळाजवळ आली अशा अनेक सूचनांची देवाण-घेवाण सुरु होती़ अशाप्रसंगी पोलिसांनी आपली सतर्कता दाखवून दिली़
सोलापूरात दुसºयांदा ‘ग्रीन कॉरिडोर’ मोहीम
अवयव हे प्रत्यारोपणासाठी विमानाने नियोजित वेळेत पाठवायचे होते. त्यासाठी पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडोर’ प्लॅन तयार केला. अवघ्या ६ मिनिटांत ५४ सेंकदात सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातुन रुग्णवाहिका सोलापूर विमानतळावर पोहोचली. सोलापूरच्या इतिहासात दुसºयांदा १४ सप्टेंबर अवयवदान प्रक्रिया पार पडली. या आधी ५ मार्च २०१७ पार पाडली होती.