चोकसीविरुद्ध आणखी एक गुन्हा; पसार होण्यापूर्वी बोरीवलीचा प्रकल्प विकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:15 AM2019-02-28T05:15:32+5:302019-02-28T05:15:47+5:30

पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या फसवणूकप्रकरणी गेल्या वर्षी जून महिन्यात ईडीने चोकसीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Another offense against Choksi; Prior to the expansion, Borivali's project was sold out | चोकसीविरुद्ध आणखी एक गुन्हा; पसार होण्यापूर्वी बोरीवलीचा प्रकल्प विकला

चोकसीविरुद्ध आणखी एक गुन्हा; पसार होण्यापूर्वी बोरीवलीचा प्रकल्प विकला

googlenewsNext

मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या गीतांजली समूहाच्या मेहुल चोकसीविरुद्ध मुंबईत आणखी एक गुन्हा सोमवारी दाखल झाला. पंजाब नॅशनल बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, बोरीवलीतील बांधकाम प्रकल्पाची परस्पर विक्री करून तो परदेशात पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्याने साडेसदतीस कोटींची फसवणूक केली आहे.


पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या फसवणूकप्रकरणी गेल्या वर्षी जून महिन्यात ईडीने चोकसीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ त्याच्या मुंबईसह देशातील संपत्तीवर जप्ती आणण्यास सुरुवात केली. त्यात बोरीवलीतील दत्तपाडा येथील बांधकाम प्रकल्पही सील केला.
धक्कादायक म्हणजे, चोकसीने हाच प्रकल्प लक्ष्मी ग्रुप आॅफ कंपनीला विकून त्यांची ३७ कोटींना फसवणूक केली. कंपनीचे फायनान्स मॅनेजर भावीन चंद्रकांत शहा (३४) यांच्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी चोकसीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


शहा यांच्या तक्रारीनुसार आॅगस्ट २०१७ मध्ये चोकसीने कंपनीच्या अध्यक्षांशी संपर्क साधून, बोरीवलीतील बांधकाम विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला गजेरा यांनी नकार दिला. त्यानंतर प्रकल्पातून जास्तीच्या नफ्याची आशा दाखवून चोकसीने त्यांना जाळ्यात ओढले. त्यांच्यावर विश्वास ठेवून लक्ष्मी ग्रुपने प्रकल्पाची पाहणी केली. तेव्हा, चोकसीही हजर होता. तत्त्व रेसिडेन्शियल प्रकल्पाच्या दोन इमारतींचे आरसीसी बांधकाम झाले होते. आतील काम अर्धवट होते. २९ कोटी ९० लाखांना प्रकल्प खरेदी करण्याचे ठरले. त्यानुसार, त्यांनी चोकसीला पैसे दिले.


ठरल्याप्रमाणे गेल्या वर्षी जानेवारीत करारनामा झाला. त्याचा मालकी ताबा मेसर्स लक्ष्मी इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिडेट कंपनीकडे आला. करारनाम्यानुसार १५५ फ्लॅटपैकी १०५ फ्लॅट हे चोकसीने यापूर्वीच ग्राहकांना विकले. उर्वरित ५० फ्लॅट हे लक्ष्मी ग्रुपला मिळणार होते.
त्यानुसार, त्यांनी बांधकाम व्यावसायिक नेमून कामाला सुरुवात केली. जवळपास ७ कोटी ३२ लाखांचा खर्च आला. त्यापैकी पावणेपाच कोटी त्यांनी बांधकाम व्यावसायिकाला दिले. यात त्यांची एकूण साडेसदतीस कोटींची फसवणूक झाली.

पीएनबी घोटाळ्यातील पैशांतूनच प्रकल्पाची केली खरेदी
च्चोकसीने पीएनबी घोटाळ्यातील पैशांतून बोरीवलीतील प्रकल्प खरेदी केला होता. पुढे घोटाळा उघडकीस आल्यानंतर हा प्रकल्प जप्त होऊ शकतो ही माहिती असतानाही त्याने प्रकल्प विकण्याची घाई केली आणि तो परदेशात पसार झाला.
च्चोकसीच्या घोटाळ्याची माहिती वृत्तपत्रांतून मिळताच लक्ष्मी ग्रुपने पोलिसांत धाव घेतली. चोकसीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनी दुजोरा देत या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.

Web Title: Another offense against Choksi; Prior to the expansion, Borivali's project was sold out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.