सोमय्यांविरुद्ध आणखी ५० कोटींचा दावा ठोकणार - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:23 AM2021-09-21T11:23:13+5:302021-09-21T11:27:27+5:30

चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात (कोल्हापूर) भाजप झीरो झाला आहे, त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणार होते पण अमित शहांच्या मैत्रीमुळे टिकले.

Another Rs 50 crore Claim will be filed against Somaiya says Rural Development Minister Hasan Mushrif | सोमय्यांविरुद्ध आणखी ५० कोटींचा दावा ठोकणार - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

सोमय्यांविरुद्ध आणखी ५० कोटींचा दावा ठोकणार - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

Next

मुंबई : किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आरोपांची तोफ डागल्यानंतर मंत्रालयासमोरील आपल्या बंगल्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमय्यांविरुद्ध १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचे मी आधीच जाहीर केले आहे. आता आजच्या आरोपांवर आणखी ५० कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे ते म्हणाले. 

चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात (कोल्हापूर) भाजप झीरो झाला आहे, त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणार होते पण अमित शहांच्या मैत्रीमुळे टिकले. सोमय्यांचा वापर ते माझ्याविरुद्ध करून घेत आहेत, त्यांनी मर्दासारखे लढावे. राज्य सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा डाव आहे. सोमय्यांची तर सीएची पदवीही मला शंकास्पद वाटते. 
 

 

Web Title: Another Rs 50 crore Claim will be filed against Somaiya says Rural Development Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.