दापोलीला आणखी एक विद्यापीठ?

By Admin | Published: November 20, 2015 11:16 PM2015-11-20T23:16:06+5:302015-11-21T00:19:46+5:30

जागा देण्याची तयारी : मेरिटाईम युनिव्हर्सिटीसाठी १०० एकर जार्गा

Another school in Dapoli? | दापोलीला आणखी एक विद्यापीठ?

दापोलीला आणखी एक विद्यापीठ?

googlenewsNext

दापोली : दापोलीत समुद्रानजीक १०० एकर सलग जागा उपलब्ध झाल्यास मेरिटाईम युनिव्हर्सिटी सुरू करण्याची केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या घोषणा केली. रामराजे महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी संदीप राजपुरे यांनी यासाठी १०० एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी अनंत गीते यांनी तत्वत: होकार दिला आहे. यामुळे लवकरच दापोलीला आणखी एक विद्यापीठ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दापोली तालुक्यातील करंजाणी ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अनंत गीते यांनी चिपळूणला कागद कारखाना, गुहागरला आॅईल रिफायनरी व दापोली आणि मंडणगडकरिता मेरिटाईम युनिव्हर्सिटीची घोषणा केली. मात्र, मेरिटाईम युनिव्हर्सिटीकरीता समुद्राजवळ सुमारे १०० एकर जागा आवश्यक असल्याचे गीते यांनी सांगितले. यावेळी गीते म्हणाले की, लाडघर येथील ग्रामस्थांशी प्राथमिक बोलणे झाले. त्यावेळी ग्रामस्थ १०० एकर जागा विनामूल्य देण्यास तयार होते. मात्र, आता त्यांना या जागेचे मूल्य हवे असल्याचे ते म्हणाले.
यासाठी कोणीही विनामूल्य जागा देण्याचे कबूल केले तरी शासकीय नियमाप्रमाणे त्यांना याचे मूल्य अदा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित असणाऱ्या संदीप राजपुरे यांनी कळंबट गावात मेरिटाईम युनिव्हर्सिटी होणार असल्यास आपण पुढाकार घेऊन १०० एकर जागा सदर कामाकरिता उपलब्ध करून देऊ, असे जाहीर केले. यावर दोन्ही गावांतील जागांची लवकरच तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात येईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे गीते यांनी सांगितले. यामुळे मेरिटाईम युनिव्हर्सिटीच्या जागेचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. (प्रतिनिधी)

दापोलीत सध्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असून, तेथे हजारों विद्यार्थी विविध शाखांमध्ये कृषीचे शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाची मत्स्य शाखादेखील रत्नागिरीत आहे. विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी देखील जगभर प्रसिध्द आहे. दापोलीला लागून असणाऱ्या आपटी गावात येथील माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांचे होमिओपथिक मेडिकल कॉलेज आहे. दापोलीत रामराजे महाविद्यालयात नर्सिंग, जर्नालिझम, हॉटेल मॅनेजमेंट सारखे व्यवसाभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम शिकवले जातात. काही वर्षांपर्यंत तीन भारतरत्नांच्या या गावात विज्ञानाचे शिक्षण देण्याची असणारी वानवा संपुष्टात येऊन विद्यार्थ्यांचा शास्त्रज्ञ होण्याचा मार्गदेखील प्रशस्त झाला आहे. आता या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

Web Title: Another school in Dapoli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.