वक्फच्या मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण होणार
By admin | Published: November 16, 2016 05:16 AM2016-11-16T05:16:35+5:302016-11-16T05:16:35+5:30
वक्फ बोर्डांतर्गत येणाऱ्या मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी सर्वेक्षण आयुक्त, अतिरिक्त आयुक्त
मुंबई : वक्फ बोर्डांतर्गत येणाऱ्या मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी सर्वेक्षण आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
यापूर्वी २००२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात १ जानेवारी १९९६ पर्यंत अस्तित्वात असलेल्या वक्फ मालमत्तांचे आणि संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता नवीन सर्वेक्षणात १ जानेवारी ९६ पासून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या आणि पहिल्या सर्वेक्षणात समाविष्ट न झालेल्या संस्थांचेही सर्वेक्षण करण्यात येईल. आधी परभणी आणि पुणे जिल्ह्यातील जमिनीचे सर्वेक्षण पथदर्शी म्हणून केले जाईल. या सर्वेक्षणात वक्फ मालमत्तांवरील ताबा, ताब्याच्या कायदेशीर बाबी आणि त्यावर अतिक्रमण असल्यास त्याची स्थिती आदींबाबतची नोंद घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)