पुण्यात नाही बनणार दुसरा ट्रम्प टॉवर
By admin | Published: January 6, 2017 11:47 AM2017-01-06T11:47:32+5:302017-01-06T11:49:22+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशातील बांधकाम प्रकल्पांमधून अंग काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशातील बांधकाम प्रकल्पांमधून अंग काढून घेण्यास सुरुवात केली आहे. यात भारतातील पुण्यातील एका रिअल इस्टेट प्रकल्पाचा समावेश आहे. ट्रम्प यांचा रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय असून अमेरिकेसह विविध देशात त्यांची गुंतवणूक आहे.
रिअल इस्टेट बरोबर ब्राझील, अझरबैजान आणि जॉर्जिया येथील हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करणार नसल्याचे ट्रम्प यांच्या कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यात ट्रम्प यांच्या कंपनीसोबत दुस-या प्रकल्पावर काम करण्याची योजना यापूर्वीच गुंडाळल्याची माहिती पंचशील रिअॅलिटी या रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनीने दिली.
ट्रम्प यांच्या कंपनीला जो प्रकल्प उभारायचा होता तिथे एका फ्लॅटची किंमत 20 कोटी असणार होती. इतक्या महागडया किंमतीला खरेदीदार मिळणे अशक्य असल्याने हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. पुण्यात कल्याणीनगरमध्ये पंचशील रिअॅलिटीने 20 मजली ट्रम्प टॉवर उभारला. त्यातील सँपल फ्लॅट पाहून ट्रम्प आकर्षित झाले होते. त्यावेळी त्यांनी आपण पुण्यात गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते.