एसी डबल डेकरचा दुसरा प्रयोग
By Admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:12+5:302015-12-05T09:07:12+5:30
मागील वर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या पहिल्या एसी डबल डेकरला नंतर रेल्वे प्रशासनाकडून सायडिंगला ठेवण्यात आल्यानंतर आता रेल्वेकडून दुसरा
मुंबई : मागील वर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या पहिल्या एसी डबल डेकरला नंतर रेल्वे प्रशासनाकडून सायडिंगला ठेवण्यात आल्यानंतर आता रेल्वेकडून दुसरा प्रयोग केला जात आहे. मध्य आणि कोकण रेल्वेकडून दुसरी नवी एसी डबल डेकर ट्रेन ६ डिसेंबर रोजी सुरू करण्यात येत आहे. ही ट्रेन एलटीटी ते मडगाव अशी धावणार असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या ट्रेनचा शुभारंभ करण्यात येईल.
मागील वर्षी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत रेल्वे प्रशासनाकडून एलटीटी ते मडगाव अशी पहिली एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्यात आली. मात्र प्रिमियम म्हणून सुरू केलेल्या या ट्रेनकडे जास्त भाड्यामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यानंतर गर्दीचा काळ नसताना दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रिमियम म्हणून पुन्हा चालविण्यात आली, तरीही त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळालाच नाही.कालांतराने पहिली एसी डबल डेकर ट्रेन देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पश्चिम रेल्वेकडे सायडिंगला ठेवण्यात आली. पहिला प्रयोग फसल्यानंतर आता मध्य आणि कोकण रेल्वेकडून आणखी एक एसी डबल डेकर ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
थांबे : एसी डबल डेकरला ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम व करमाळी स्थानकात थांबा दिलाय.