अहमदनगर दारुकांडात आणखी एक बळी

By admin | Published: February 19, 2017 09:11 AM2017-02-19T09:11:34+5:302017-02-19T09:11:34+5:30

गेल्या आटवड्या पांगरमल येथे राजकीय नेत्यांच्या रविवार रात्रीच्या ओल्या पार्टीत मद्य प्राशन केल्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या आठ झाली आहे.

Another victim in Ahmednagar Darukanda | अहमदनगर दारुकांडात आणखी एक बळी

अहमदनगर दारुकांडात आणखी एक बळी

Next

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 19 : गेल्या आटवड्या पांगरमल येथे राजकीय नेत्यांच्या रविवार रात्रीच्या ओल्या पार्टीत मद्य प्राशन केल्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या आठ झाली आहे. काल रात्री उद्धव आव्हाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्य़ाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेस कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांसह सहा जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे़.

मद्यसेवनामुळे सोमवारी रात्री पोपट व दिलीप आव्हाड या भावांचा सोमवारी तर राजेंद्र आंधळे व प्रभाकर पेटारे यांचा मंगळवारी मृत्यू झाला़ आव्हाड यांचे बंधू बबन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून जेऊर गणातून उमेदवारी करणारे मंगल आव्हाड व गटातून उमेदवारी करणाऱ्या भाग्यश्री मोकाटे यांच्यासह भिमराज आव्हाड, रावसाहेब आव्हाड, महादेव आव्हाड यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

मंगल यांच्या घरी रविवारी पार्टीचे आयोज करण्यात आले होते़ त्यात देशी दारू देण्यात आली़ दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते या पार्टीत सहभागी झाले होते़ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास काहींना त्रास सुरू झाला़ त्यांना उपचारासाठी नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़.

जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमध्ये तयार होते बनावट दारू
शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या कंटीनमध्येच बनावट दारू तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी वितरित केली जात असल्याची बाब समोर आली आहे. आव्हाड याने जिल्हा रुग्णालयातील कँटीनमधून दारू खरेदी केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी या कँटीनवर छापा टाकून तपासणी केली असता बनावट दारू तयार करण्याचे रसायन व मोकळ्या बाटल्या पोलिसांनी आढळून आल्या आहेत. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत़

Web Title: Another victim in Ahmednagar Darukanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.