पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक व्हिडीओ; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांना दमदाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 09:41 AM2024-07-12T09:41:15+5:302024-07-12T09:42:25+5:30

Pooja Khedkar Latest News: काल पुण्यात मनोरमा यांच्याकडून पोलिसांना आणि माध्यमाना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Another video of Pooja Khedkar's mother Manorama Khedkar viral; Taking a pistol in his hand, he forces the farmers in Pune Mulshi | पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक व्हिडीओ; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांना दमदाटी

पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक व्हिडीओ; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांना दमदाटी

महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या फॅमिलीचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. काल तिची गाडी जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पूज खेडकर यांची आई मनोरमा खेडकर हिने मी सगळ्यांना आत टाकेन अशी धमकी देत गेट उघडण्यास मज्जाव केला होता. याच मनोरमा खेडकर हिचा शेतकऱ्यांना दमदाटी करतानाचा व्हिडीओ समोर येत आहे. 

पूजा खेडकरांची ऑडी कार कोणाची? रातोरात बंगल्याच्या आवारातून पजेरोही गायब झाली

काल पुण्यात मनोरमा यांच्याकडून पोलिसांना आणि माध्यमाना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पूजा खेडकर यांच्याकडे मोटारीने वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा थकीत दंड आहे. पुणे वाहतूक पोलीस नोटीस घेऊन पूजा खेडकरच्या घरी गेले होते. गेट उघडण्यासाठी खेडकरच्या कुटुंबीयांना आवाज दिला गेला, परंतू पूजा खेडकरच्या घरच्यांकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच खेडकर यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी केली होती.

आता मनोरमा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या बाऊन्सर सोबत घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांनी ते एका शेतकऱ्यावर रोखल्याचेही दिसत आहे. जमिनीचा मूळ मालक आणि मनोरमा यांच्यात कोर्टाच वाद सुरु आहे, असे या संभाषणातून स्पष्ट होत आहे. आता बिल्डर बाळाच्या अंडर्व्ल्डशी संबंध असलेल्या आजोबाला आत टाकणाऱे पुणे पोलीस या व्हिडीओवरून मनोरमा खेडकर यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा! चोराला सोडविण्यासाठी डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला केला फोन

कोण आहेत पूजा खेडकर...
पूजा खेडकर यांनी अंशतः दृष्टिहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यातून त्यांना आयएएस परीक्षेत ८२१वी श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळाले होते. सुरुवातीला प्रशिक्षणासाठी त्यांना भंडारा जिल्हा देण्यात आला. मात्र, नाट्यमय घडामोडींनंतर पुणे देण्यात आला. रुजू होण्यापूर्वीच त्यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, दालन तसेच कर्मचाऱ्यांची मागणी केली. दालनाची व्यवस्था न केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे दालन बळकावले. स्वत:च्या ऑडीवर लाल दिवा लावला

 

Web Title: Another video of Pooja Khedkar's mother Manorama Khedkar viral; Taking a pistol in his hand, he forces the farmers in Pune Mulshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.