भरतीतील मृत्यू प्रकरणी प्रत्युत्तर द्या - हायकोर्ट
By Admin | Published: June 24, 2014 12:23 AM2014-06-24T00:23:43+5:302014-06-24T00:23:43+5:30
पोलीस भरती प्रक्रियेत पाच उमेदवारांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस महासंचालक संजीव दयाळ व पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिल़े
>मुंबई : पोलीस भरती प्रक्रियेत पाच उमेदवारांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस महासंचालक संजीव दयाळ व पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिल़े या प्रकरणी ऑल महाराष्ट्र ह्युमन राईटस् वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयाला पत्र लिहिले होत़े
या भरती प्रकियेत मैदानी चाचणीत पाच जणांचा बळी गेला़ भरतीसाठी मुंबईत आलेल्या उमेदवारांना पाणी, जेवण, शौचालय व राहण्याची सोय शासनाने केली नाही़ त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठी नियमावली तयार करावी व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीही असावी़
तसेच यंदाच्या भरती प्रक्रियेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या पत्रत करण्यात आली होती़ त्याची दखल घेत न्यायालयाने या पत्रचे सुओमोटो जनहित याचिकेत रूपांतर करून घेतल़े मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी एका आठवडय़ासाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)