‘मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर उत्तर द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:37 AM2017-08-03T03:37:30+5:302017-08-03T03:37:33+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर २५ आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
Next
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर २५ आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष यासंदर्भात सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली
असून प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. प्रशांत ठाकरे
यांची न्यायालय मित्र म्हणून
नियुक्ती केली आहे. या
प्रकरणातील प्रतिवादींमध्ये
शिक्षण अधिकाºयांसह इतरांचा समावेश आहे़