सहा प्रश्नांची उत्तरे द्या; अशोक चव्हाण यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:59 AM2019-01-01T01:59:40+5:302019-01-01T02:00:03+5:30

राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ््यांचे आरोप आहेत. पण अगुस्ता वेस्टलँडबाबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी खोटे आरोप केले.

Answer six questions; Ashok Chavan's challenge | सहा प्रश्नांची उत्तरे द्या; अशोक चव्हाण यांचे आव्हान

सहा प्रश्नांची उत्तरे द्या; अशोक चव्हाण यांचे आव्हान

googlenewsNext

मुंबई : राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ््यांचे आरोप आहेत. पण अगुस्ता वेस्टलँडबाबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी खोटे आरोप केले. त्यांची पत्रकार परिषद म्हणजे चोराच्या उलच्या बोंबा आहेत. त्यांनी राफेल खरेदी घोटाळ््यावरही पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिले.
चव्हाण यांनी अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी ६ प्रश्न उपस्थित केले असून त्यांची उत्तरेही मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत असे चव्हाण म्हणाले.
१) अगुस्ता वेस्टलँड/ फिनमेकेनिकाला ब्लॅकलिस्टेड कंपन्यांच्या यादीतून का वगळले? २) ब्लॅकलिस्टेड कंपनी अगुस्ता वेस्टलँड/ फिनमेकेनिकाला ‘मेक इन इंडियात’ का सहभागी करून घेतले? ३) अगुस्ताला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून गुंतवणुकीची परवानगी देऊन एडब्ल्यू ११९ सैनिक हेलीकॉप्टर उत्पादनाची परवानगी का दिली? ४) या कंपनीला १०० नौसेना हेलिकॉप्टरसाठी बोली लावण्याची परवानगी का दिली? ५) मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड विरोधातील/ फिनमेकेनिका विरोधातील सर्व खटले हरल्यावरही अपिलात का गेले नाही? ६) ख्रिश्चन मिशेलचा वापर करून खोट्या कथा रचून मोदी सरकार स्वत:चा भ्रष्टाचार आणि घोटाळे लपवण्यासाठी का करत आहे?, या प्रश्नांची उत्तरे कोण देणार असेही खा. चव्हाण म्हणाले.

सहारा डायरीचे काय?
सहारा डायरीत भाजपाच्या नेत्यांची नावे आहेत. त्याबाबत माहिती द्यावी आणि मगच काँग्रेस नेत्यांकडे स्पष्टीकरण मागावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Answer six questions; Ashok Chavan's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.