कर्जे नियमित करण्याचे आमिष दाखवून भाजपकडून विरोधी आमदारांचे इनकमिंग सुरू

By appasaheb.patil | Published: July 26, 2019 01:02 PM2019-07-26T13:02:07+5:302019-07-26T13:20:21+5:30

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपा सरकारवर आरोप

Anti-BJP lawmakers are incoming by showing inclination to regulate loans: Sushilkumar Shinde | कर्जे नियमित करण्याचे आमिष दाखवून भाजपकडून विरोधी आमदारांचे इनकमिंग सुरू

कर्जे नियमित करण्याचे आमिष दाखवून भाजपकडून विरोधी आमदारांचे इनकमिंग सुरू

Next
ठळक मुद्दे- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर दौºयावर- काँग्रेस भवनात काँग्रेसच्या पदाधिकाºयांशी साधला संवाद- आगामी विधानसभा निवडणुकीविषयी केली चर्चा

सोलापूर : साखर कारखान्यांच्या कर्जासाठी आर्थिक गळचेपी करून इतरांना पक्षात घेतले जात आहे़  हे फार काळ टिकणार नाही अशी टिका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

 शिंदे हे सोलापूर दौºयावर आहेत. सकाळी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  भाजप पक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार जाणार अशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच सोलापूर भेटीत घोषणा केली होती़, त्यावर शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, साखर कारखानदारांची अडचण केली जात आहे़. त्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून त्यांना भाजप प्रवेश दिला जात आहे़ .  अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत़; पण ते फार काळ टिकणार नाही, ज्यांनी प्रवेश केला त्यांच्या अडचणी सोडविण्यात आलेल्याच नाहीत. त्यामुळे अडचणीत आल्याची भावना त्याच्यात झाली आहे़. 

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार राजीनामा देतील असे म्हटले होते, मात्र आठवडाभरात एकाही आमदाराने राजीनामा दिला नाही़, त्यामुळे त्याच्या म्हणण्यात तथ्य नाही असेही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Anti-BJP lawmakers are incoming by showing inclination to regulate loans: Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.